Advertisement

 चारचाकी ठरणार लाडक्या बहिणींची डोकेदुखी

प्रजापत्र | Tuesday, 04/02/2025
बातमी शेअर करा

मुंबई - सत्तेत येण्यासाठी महायुतीला फायदेशीर ठरलेली (Ladki Bahini Yojana) 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' सध्या नाराज असल्याचे चित्र आहे, कारण आणखी काही लाडक्या बहिणींना या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. योजनेबाबत नवीन निकष आल्यामुळे अनेक बहिणींना योजनेचा लाभ मिळणार नाही.

  या योजनेच्या लाभार्थ्यांकडे जर चारचाकी असेल तर त्या अपात्र ठरणार आहेत.त्यांच्या घरी चारचाकी आहे की नाही याची तपासणी होणार आहे. अंगणवाडी सेविका या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींच्या घरी जाणार असून पडताळणी करणार आहेत.(mahila bal vikas) महिला व बालविकास विभागाने याबाबत आदेश दिले आहेत.

महिलांच्या कुटुंबाच्या नावावर कोणतीही चारचाकी वाहन नाही ना याची पडताळणी अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका (दि.४) आजपासून सुरु करणार आहेत. चारचाकी वाहन असणाऱ्यांची यादी परिवहन विभागाकडून मागवण्यात आली आहे. त्याआधारे (Ladki Bahini Yojana)लाडक्या बहि‍णींच्या घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. नव्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

 

 

 

काय आहेत नवे निकष?

 

संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा तसेच प्राप्तिकर भरणारा नसावा.

कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन असल्यास अपात्र ठरेल.

महिलेचे वय १८ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असावे.

Advertisement

Advertisement