Advertisement

साई संस्थानच्या तीन कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला दोघांचा मृत्यु

प्रजापत्र | Monday, 03/02/2025
बातमी शेअर करा

 नगर- (Shirdi) शिर्डीमध्ये आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साई संस्थानच्या तीन कर्मचाऱ्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञातांकडून चाकू हल्ला करण्यात आला आहे. यात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाला असून तिसऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु आहे.मिळालेल्या माहितीनुसार पहाटे हे कर्मचारी शहरातील वेगवेगळ्या भागांतून कामावर निघाले होते त्यावेळी अज्ञांतानी हा हल्ला केला. यात दोघे ठार झाले. तर तिसरा कर्मचारी गंभीर जखमी झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिस (Police)आरोपींचा शोध घेत आहेत.
 

Advertisement

Advertisement