Advertisement

भाविकांची बस २०० फूटदरीत कोसळली, ७ जणांचा मृत्यु

प्रजापत्र | Sunday, 02/02/2025
बातमी शेअर करा

नाशिक- नाशिकवरुन सूरतला जाणाऱ्या भाविकांच्या बसला (bus accident) भीषण अपघात झाला या अपघातात सात भाविकांचा मृत्यु झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला. जखमींना रुग्णालयात दाखल केले गेले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृत आणि जखमी हे मध्यप्रदेशातील असल्याची माहिती मिळत आहे.

अधिक माहितीनुसार मध्यप्रदेशातील भाविक खासगी बसने देवदर्शनासाठी नाशिकला आले होते. त्यानंतर ते सुरतला निघाले होते. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सापुतारा घाटातील एका वळणावर ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने (bus accident)बस २०० फूट दरीत कोसळली. या अपघात ७ जणांचा जागीच मृत्यु झाला असून १५  जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून (police)पोलिस पुढील तपास करत आहे.  

Advertisement

Advertisement