मुंबई - इयत्ता दहावी आणि १२ वीच्या परीक्षेत बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्याकडे केली आहे. त्यासंबंधी त्यांनी अधिकृत पत्र दादा भुसे यांना दिले आहे. आता यावर मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या वक्तव्यावर दादा भुसे (Dada Bhuse)म्हणाले की, कॉपीमुक्त परीक्षा हे आपल्या शिक्षण विभागाचं अभियान राहिलेलं आहे. कॉपी कुणी करणार नाही याची विभाग काळजी घेत आहे. परीक्षा केंद्रात कॅमेरे बसवलेले आहेत. पोलीस बंदोबस्त देखील आहे. पर्यवेक्षक आहेत, या सर्वांच्या माध्यमातून कोणी विद्यार्थी कॉपी करणार नाही याची विभाग काळजी घेत आहे. बुरखा घातलेला असू दे किंवा विना बुरखा घातलेला असू दे, कोणी विद्यार्थी कॉपी करणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.