Advertisement

 सुदर्शन घुलेला ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी,

प्रजापत्र | Monday, 27/01/2025
बातमी शेअर करा

 संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेसंदर्भात (Sudarshan Ghule) SIT ने बीड जिल्हा न्यायालयाला पोलीस कोठडी देण्यात यावी असा अर्ज केला होता .संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh case) केल्यानंतर  वाल्मीक कराडशी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेने दूरध्वनी वरून संभाषण केले होते .या संदर्भात एसआयटीला महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून सुदर्शन घुलेच्या मोबाईल मधील डाटा हस्तगत करण्यात आल्याची माहिती आहे .या डाटाचा पुढील तपास करण्यासाठी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे .(Beed) 

संतोष देशमुख हत्याकांड आणि मकोका अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील तसेच सरकारी पक्षाकडून वकील बाळासाहेब कोल्हे तसेच आरोपीचे वकील अनंत तिडके बीड न्यायालयात हजर होते . संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुले याच्या मोबाईल तपासणीसाठी एसआयटी कडून आज पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आली होती . दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. आरोपीचे जप्त केलेल्या 02 मोबाईल पैकी एक मोबाईलचे लॉक ओपन झालेले नसुन आरोपीकडुन मोबाईल लॉक ओपन करुन घेणे अत्यंत आवश्यक आहे. असे सांगण्यात आले. .

Advertisement

Advertisement