Advertisement

'छावा'मधला लेझीमचा सीन डिलीट करणार

प्रजापत्र | Monday, 27/01/2025
बातमी शेअर करा

 मुंबई - विक्की कौशल (Vicky Kaushal), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अक्षय खन्ना (Akshay Khanna) अभिनीत छावा चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरनं अनेकांच्या मनाचा ठाव घेतला, पण त्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या काही दृश्यांनी मात्र प्रेक्षकांचा संताप ओढवून घेतला. छावा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीवर आधारित आहे. अशातच, या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी राजे आणि महाराणी येसुबाई लेझीम खेळतानाचा एक सीन दाखवण्यात आला आहे. नेमका याच सीनवर अनेक शीवप्रेमींनी आक्षेप घेतला आहे. यावरुन बहुचर्चित 'छावा' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पण, आता शीवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे 'छावा'मधला लेझीमचा सीन डिलीट करणार असल्याचं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी जाहीर करून टाकलं आहे.

Advertisement

Advertisement