पुणे- पुण्यामध्ये ३२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. धर्मांतरासाठी दबाव टाकून बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडित महिलेला आरोपींना डांबून देखील ठेवले होते. याप्रकरणी लोहगाव पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. पोलिसांकडून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्यासाठी एका ३२ वर्षीय महिलेला जबरदस्ती करण्यात आली. इतकेच नाही तर या महिलेला एका घरात डांबून ठेवत तिच्यावर दोघांनी सामूहिक बलात्कार केला. हा संपूर्ण प्रकार विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे. ३२ वर्षीय पीडित महिलेने याप्रकरणी तक्रार दिली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींनी पीडित महिलेवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला. यातील ३० वर्षीय आरोपी महिलेने पीडित महिलेला आपल्या घरात डांबून ठेवले. तर इतर दोन आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी अत्याचार करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल ही केला.
व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर आरोपी वारंवार महिलेला धमकावत होते. त्यानंतरही आरोपीने या महिलेवर वारंवार बलात्कार केला. इतकेच नाही तर तिन्ही आरोपींनी पीडित महिलेच्या घरातील देवांच्या प्रतिमेची तोडफोड केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी तक्रार आल्यानंतर विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलिस करत आहेत. या घटनेमुळे पुणे हादरले आहे.