Advertisement

‘छावा’ चित्रपटाला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

प्रजापत्र | Friday, 24/01/2025
बातमी शेअर करा

अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना स्टारर ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित झाला. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. चित्रपटात विकी कौशल लेझिमवर नृत्य करताना दिसला आहे. ज्यावर संभाजी राजे यांच्यासह तृप्ती देसाई यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. तर ‘छावा’ सिनेमातील त्या दृश्याला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध होत आहे.

 

विकी कौशल याच्या लेझिम नृत्यावर नाराजी व्यक्त करत संभाजी राजे म्हणाले, ‘छावा चित्रपटात संभाजीराजे हे लेझिमवर नृत्य करताना दिसले आहेत. लेझिम खेळताना दाखविणं चुकीचं नाही, पण ते लेझिमवर नृत्य करताना दाखविले आहेत. सिनेमॅटिक लिबर्टी किती घ्यावी याला देखील काही मर्यादा आहेत. संभाजी राजे यांच्या जीवनावर छावा चित्रपट होतोय ही आनंदाची बाब आहे.

पुढे संभाजी राजे म्हणाले, ‘चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी माझी भेट घेतली होती, त्यावेळेला सर्व चित्रपट झाल्यानंतर तो चित्रपट इतिहास अभ्यासकांसोबत दाखवा अशी विनंती केली होती. आता देखील त्यांना विनंती आहे, त्यांनी आम्हाला आणि इतिहास संशोधकांना तो चित्रपट दाखवावा.छत्रपती संभाजी महाराज याच्या जीवनावर चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक उत्तेकर एक मराठी माणूस आहे त्यांनी खूप मोठं धाडस करून संभाजी महाराजांवर चित्रपट बनवला आहे. त्यामुळे यामध्ये कुठलेही चुका राहू नयेत अशीच आमची ही इच्छा आहे. असं देखील संभाजी राजे म्हणाले.

सांगायचं झालं तर, सध्या सर्वत्र ‘छावा’ चित्रपटाची चर्चा रंगली आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाच्या प्रतीक्षेत चाहते आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर अभिनेता विकी कौशलच्या अभिनयकौशल्याचंही खूप कौतुक होतंय. ‘छावा’ हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सर्वत्र ‘छावा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.
 

Advertisement

Advertisement