भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, “अजित पवार यांच्याकडे पक्षप्रवेशासाठी एक मोठी यादी आहे, तसेच भाजपाकडेही पक्षप्रवेशासाठी मोठी यादी आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडेही पक्षप्रवेशासाठी एक यादी आहे. त्यामुळे आम्ही तिघेही एकत्र बसून कोणत्या पक्षप्रवेशामुळे महायुती अजून भक्कम होईल? म्हणजे कोणत्या नेत्याच्या पक्ष प्रवेशामुळे महायुती आणखी मजबूत होईल आणि कोणत्या पक्षामुळे महायुतीला धोका निर्माण होईल याचा विचार आम्ही करणार आहोत”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
बातमी शेअर करा