Advertisement

वैद्यनाथांच्या दर्शनानंतर धनंजय मुंडे अॅक्शन मोडवर 

प्रजापत्र | Thursday, 16/01/2025
बातमी शेअर करा

परळी दि.१६ (प्रतिनिधी) -(parli) मुंबईवरून बुधवारी सकाळी परळीत दाखल झालेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री (Dhananjay Munde) धनंजय मुंडे यांनी गुरुवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतले. मंत्री (Dhananjay Munde) धनंजय मुंडे यांनी आपल्या जगमित्र कार्यालयात जनता दरबार भरविला आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या ते गाठीभेटी घेत आहेत. दरम्यान, आज गुरुवारपासून शहरातील बाजारपेठ सुरळीत झाली आहे.

वाल्मीक कराडवर (walmik karad) मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर मंगळवारी शहरात तीव्र पडसाद उमटले. परळी पोलीस ठाण्यासमोर कराड नातेवाईकांनी आंदोलन करून चार समर्थक कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. तर बुधवारी पांगरी गावात कराड समर्थक यांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले. (walmik karad)वाल्मीक कराडवरील खोटे गुन्हे मागे घ्या, या मागणीसाठी दोन दिवस (parli) परळी शहर बंद होते. तसेच परळी तालुक्यातील धर्मापुरी ,सीरसाळा येथेही बंद पुकारण्यात आला होता.या पार्श्वभूमीवर मंत्री धनंजय मुंडे मुंबईहून तातडीने बुधवारी सकाळी परळीत दाखल झाले. त्यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केल्याचे कळते.  त्यानंतर गुरुवारपासून शहरातील बाजारपेठ सुरळीत झाली आहे. (Dhananjay Munde) धनंजय मुंडे यांनी आपल्या जगमित्र कार्यालयात जनता दरबार भरविला आहे  या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या ते गाठीभेटी घेत आहे.

 

Advertisement

Advertisement