मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची देवगिरी बंगल्यावर एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला यशवंत माने, देवेंद्र भुयार,बाळासाहेब आजबे, सुनील टिंगरे, अतुल बेनके आणि राजेश पाटील उपस्थित होते. या बैठकीत उमेदवारांच्या पराभवाच्या कारणा संदर्भात चर्चा झाली. तर पराभूत उमेदवारांकडून भाजपच्या भूमकेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे. अजित पवारांनी सर्व पराभूत उमेदवारांना पाठीशी असल्याचा विश्वाश देत आता पूर्ण ताकदीनीशी काम करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच पुढील निवडणुकीत कसं जिंकून येऊ शकता यावर काम करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.
बातमी शेअर करा