Advertisement

देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार

प्रजापत्र | Wednesday, 04/12/2024
बातमी शेअर करा

मुंबई- राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून भाजपाच्या बैठकीत हा ठराव करण्यात आला. भाजपाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन केलंय.

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होणार आहे. या नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत. मुख्यमंत्री पदाच्या चर्चेकरता केंद्रीय निरिक्षक आज मुंबईत आले. निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठरला. तर उर्वरित भाजपाच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर अनुमोदन दिलं. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे.

Advertisement

Advertisement