Advertisement

वडिलांच्या निधनाच्या धक्क्याने नऊ वर्षांच्या चिमुकलीने सोडले प्राण

प्रजापत्र | Tuesday, 03/12/2024
बातमी शेअर करा

अहिल्यानगर- तालुक्यातील शिरेगाव येथे शुक्रवार (दि.२९नोव्हेंबर) रोजी वडिलांच्या निधनाच्या धक्क्याने दुसर्‍या दिवशी मुलीनेही प्राण सोडल्याची घटना घडली. बाळासाहेब गेणदास जाधव (वय ३८) व श्रद्धा बाळासाहेब जाधव (वय ९ वर्ष) असे बापलेकीचे नाव आहे.

 

अधिक माहिती अशी कि,किडनीच्या आजाराने त्रस्त असलेले बाळासाहेब नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे शुक्रवार (दि.२९ नोव्हेंबर)रोजी निधन झाले. शुक्रवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिलांच्या निधनाचा धक्का बसल्यामुळे श्रद्धाला श्रीरामपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रात्री  १२.३० च्या दरम्यान उपचारादरम्यान तिचेही निधन झाले. श्रद्धा ही शिरेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकत होती . या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बाळासाहेब यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा, आई व दोन भाऊ असा परिवार आहे.

 

Advertisement

Advertisement