परळी दि.१(प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या पीडब्ल्यू विभागामध्ये इंजिनिअर म्हणून नोकरी लावतो, अशी बतावणी करून एका भावट्याने तरुणाकडून नऊ लाख रुपये उकळले. या प्रकरणी सदरील भामट्याविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी कि,जगन्नाथ बालासाहेब जाधव (वय २५.रा. कौठळी ता. परळी) यास बुद्धभूषण हेमंत पठारे (रा. वाघला ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर ह.मु. सदाशिव पेठ गांजवे चौक, टेलर बिल्डींग पुणे) याने महाराष्ट्र शासनाच्या पीडब्ल्यू विभाग मुंबई येथे इंजिनिअरची नोकरी लावतो म्हणून जाधव याच्याकडून नऊ लाख रुपये उकळले. सदरील हे पैसे आरोपीने त्याच्या अॅक्सेस बँक खाते क्र. 923010045244806 यावर टाकण्यास सांगितले होते. ऑक्टोबर २०२३ मध्ये निघालेल्या जागेवर फॉर्म भरावयास लावला, मात्र नोकरी लागली नाही, यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे जाधव यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात (दि.३०) रोजी फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपी पठारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.