ईव्हीएम विरोधात बाबा आढाव यांच्या आत्मक्लेष आंदोलनाचा आज तिसरा दिवस होता, उद्धव ठाकरेंच्या शब्दाला मान देत त्यांनी उपोषण सोडले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी त्यांच्या उपोषणाला भेट दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही त्यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत आणि सुषमा अंधारे देखील उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधा-यांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आता सत्यमेव जयते एेवजी सत्तामेव जयते सुरु आहे. राक्षसी बहुमत मिळालेले असतानाही लोक राजभवनावर जाण्याएेवजी शेतात पूजा अर्चा करायला का जात आहेत असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावला. दरम्यान बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरेंच्या हट्टाला मान देत पाणी घेऊन उपोषण सोडले.
बातमी शेअर करा