Advertisement

तर राजकारणातून निवृत्ती घेणार

प्रजापत्र | Thursday, 28/11/2024
बातमी शेअर करा

 

पंढरपूर : येत्या सहा महिन्यांमध्ये सांगोल्याच्या दुष्काळी भागात शेतीसाठी पाणी न आणल्यास मी राजकारणातून निवृत्ती घेईन; असं मोठं वक्तव्य सांगोल्यातील शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले आहे.

विधानसभा निवडणूकीत शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांचा पराभव झाला आहे. निवडणूक पार पडल्यानंतर सांगोला येथे प्रथमच शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाल्यानंतर चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना राजकीय निवृत्ती विषयी मोठे वक्तव्य केले आहे. शहाजीबापू पाटील यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सांगोला (Sangola) तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी काम करत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तसेच सांगोल्यातील अनेक भागात पाण्याचा प्रश्न निर्माण होत असून दुष्काळ जाणवत असतो. यामुळे निवडणूकीत जरी पडलो असलो; तरी एक वर्षाच्या आत सांगोल्याच्या १४ गावातील शेतात पाणी नाही आले तर राजकीय निवृत्ती घेईन, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement