मुंबई- आज मंगळवार (दि. २६ नोव्हेंबर) राज्य विधानसभेची मुदत संपत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या पदाचा आणि सरकारचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सादर केला. त्याचवेळी नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत राज्यपाल शिंदे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्य कारभार पाहण्यास सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवनावर भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दीपक केसरकर, दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी हेदेखील उपस्थित होते. दरम्यान, राजभवनावरील ही औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक होणार असल्याचे समजते.