Advertisement

निकाल लागला आता लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट देण्याची सरकारची तयारी

प्रजापत्र | Monday, 25/11/2024
बातमी शेअर करा

मुंबई : महाराष्ट्र निवडणुकीत भाजपच्या विजयाचा थेट फायदा राज्यातील महिलांना होणार असून आता तुम्हाला लाडली बेहन योजनेत जास्त पैसे मिळतील. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या ज्यामध्ये महायुतीने घवघवीत यश मिळवले आणि सरकारला पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याचे जनमत मिळाला. यावेळी निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला तर महाराष्ट्र निवडणुकीतील या निकालानंतर महाराष्ट्रातील महिलांमध्ये आनंदाची लाट उसळली असून आता विजयात मोलाचा वाटा उचललेल्या राज्यातील लाडक्या बहिणींना महायुतीच्या विजयाचा अधिक आर्थिक लाभ मिळणार आहे.

 

 

लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी?
महाराष्ट्राच्या माझी लाडकी बहिन योजनेंतर्गत आतापर्यंत पाच हप्ते जारी करण्यात आले असून राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नोव्हेंबरमध्ये योजनेचा अखेरचा हप्ता देण्यात आला होता. तर आता पुढील हप्ता कधी येईल आणि किती पैसे मिळतील यालकडे लाडक्या बहिणींची नजर लागून आहे.

लाडकी बहीण योजना राज्य सरकारद्वारे राबविली जात असून महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात या योजनेतील पैसा वाढवणार असल्याचे आश्वासन दिले होते. तर आता सरकारचा सत्तेवर परतण्याचा मार्ग मोकळा झाला असून या योजनेतीलपैसे वाढवण्याचे आश्वासन सरकार पूर्ण करेल. योजनेत किती रक्कम वाढवली जाईल? जाणून घेऊया.

 

 

राज्यातील लाडक्या बहिणींना मिळणार रिटर्न गिफ्ट
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून महायुती आघाडीला बहुमत मिळाले आणि भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील महिला सर्वाधिक खूश असतील कारण आता लाडली बहीण योजनेतील रक्कम वाढणार आहे. निवडणुकीपूर्वीच महायुतीच्या जाहीरनाम्यात याबाबत उल्लेख होता.

 

 

लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार?
सध्या महाराष्ट्र शासनाच्या माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत दिली जात आहे तर जाहीरनाम्यात १५०० रुपयांची रक्कम ६०० रुपयांनी वाढवून २,१०० रुपये करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. अशा स्थितीत, आता पुन्हा महायुती आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभही वाढणार आहेत.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार राज्यातील २.३४ कोटी सदस्य महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत असून या योजनेसाठी आलेल्या १३ लाख बहिणींचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत जे नवीन सरकार स्थापन होताच निकाली काढण्यात येतील आणि डिसेंबर महिन्यांपासून लाडक्या बहिणींना योजनेतील पुढील हप्त्याची रक्कम मिळण्यास सुरुवात होणे अपेक्षित आहे.

 

Advertisement

Advertisement