Advertisement

विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष

प्रजापत्र | Sunday, 24/11/2024
बातमी शेअर करा

मुंबई -महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात (ajit pawar)महायुतीला सर्वात मोठे यश मिळाले आहे. यानंतर आता राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, लवकरच राज्यात नवीन सरकारचा शपथविधी होईल. दरम्यान, (vidhansabha) विधानसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. विधान परिषदेच्या ६ जागा रिक्त झाल्या असून, या जागांवर कोणाची वर्णी लागणार? हे पाहणे महत्वाचे आहे.

 

कोणाच्या किती जागा रिक्त? 
विधानसभेच्या निकालानंतर विधानपरिषदेच्या एकूण सहा जागा रिक्त झाल्या आहेत. विधानपरिषदेतील (bjp)भाजपचे ४ आमदार विधानसभेवर निवडून गेले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रविण दटके यांचा यात समावेश आहे. त्यामुळे विधानपरिषदेत भाजपच्या ४ जागा रिक्त झाल्या आहेत. तर, शिवसेनेकडून आमश्या पाडवी यांचीही विधानसभेवर निवड झाली आहे. त्यामुळे(shivsena) शिवसेनेची एक जागा विधानपरिषदेत रिक्त झाली आहे.

याशिवाय, (ajit pawar) अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर हेदेखील विधानपरिषदेवर आमदार आहेत. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांची विधानपरिषदेची जागा रिक्त झाली आहे. यानुसार महायुतीच्या (vidhanparishad)विधानपरिषदेच्या एकूण ६ जागा रिक्त झाल्या आहेत. आता या जागांवर कोणाला संधी मिळणार? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Advertisement

Advertisement