मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. महायुतीने या निवडणुकीत पहिल्यांदाच 235 पेक्षा जास्त जागांवर यश मिळवले. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. आता या निकालानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार यांची सर्वानुमते पक्षाच्या गटनेतेपदी निवड केली आहे.
निवडणुकीचा निकाल लागल्यापासून भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटात बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणार असून, येत्या एक-दोन दिवसांत सरकारचा शपथविधी सोहळाही पार पडणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निकालानंतर अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरच्या झालेल्या बैठकीत अजित पवारांची गटनेतेपदी निवड झाली आहे.
बातमी शेअर करा