एकादशी निमित्त बुधवारी पंढरपूरला विठुरायाचे दर्शन घेऊन वापस सायंकाळी गावी परतल्यावर शेळगाव आर (ता .बार्शी ) येथिल वारकऱ्यांच्या पायी दिंडीत टेम्पो घुसून दोन वारकरी जागीच ठार झाले तर सहाजण जखमी झाल्याची घटना घडली आहे . त्यामुळे संपूर्ण शेळगाव ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे . याबाबत उषा गायकवाड यांनी वैराग पोलिसात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे .
विशेष म्हणजे सायंकाळी सव्वा आठ वाजता शेळगावात परतल्यावर टमटम या वाहनातून उतरून १०० मीटर पायी चालत जात असताना वारकऱ्यांच्या दिंडीत टेम्पो घुसून हा अपघात घडला आहे .यामध्ये वासुदेव भाऊ गवळी ( वय ५६ ) व तुकाराम शिवराज जाधव (वय ५२) गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . तर शालन भारत अडसूळ , दिनेश दत्तात्रेय लोहार ,तुकाराम विष्णू गिलबिले (वय ६३),उषा प्रताप गायकवाड , जोतिबा लक्ष्मण शेळके (वय ७० ) , नीलकंठ अभिमन्यू आडसुळ (वय ५५) हे सहा जण जखमी झाले आहेत .सर्व रा .शेळगाव आर ( ता .बार्शी ) येथिल वारकरी आहेत .
शेळगाव मधील वारकरी १३ नोव्हेंबर रोजी बुधवारी पंढरपूर वरून विठ्ठलाचे दर्शन घेऊन वापस टमटमने शेळगाव येथे सायंकाळी सव्वा आठच्या सुमारास उतरले .वाहनातून उतरून 100 मीटर पायी चालत जात असताना सोलापूर वरून वैरागकडे भरधाव वेगात जाणारा टेम्पो ( एम एच ४५ ए एफ ०८३४ )वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये घुसला त्यात दोन वारकरी जागीच ठार झाले तर सहा वारकरी जखमी झाले .
चालक अशोक प्रकाश मेनकुदळे (वय ४५ ) रा. वैराग (ता.बार्शी ) याने भरधाव वेगाने ट्रेम्पो चालवून अपघातासकारणीभूत ठरल्याने त्याच्यावर वैराग पोलीस ठाण्यात (दि.१४) रोजी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अधिक तपास वैराग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत जगदाळे हे करीत आहेत .