परंडा दि.१४(प्रतिनिधी)- प्रचारात आघाडी घेतलेले प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या प्रचारासाठी त्यांची नात सखीताई धनंजय सावंत या आपल्या आजोबाच्या प्रचारार्थ प्रचारात उतरत गावभेट दौरे, सभांचा धडाका लावला आहे. सद्या तरी त्या या निवडणुकीतील शिवसेनेच्या स्टार प्रचारक ठरल्या असून, त्यांच्या जनसंवाद दौर्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मतदारसंघात झालेली विकासकामे, आणि विकासाचा अनुशेष कायमचा संपविण्यासाठी पुन्हा एकदा प्रा. डॉ. तानाजी सावंत यांना विजयी करण्याचे आवाहन त्या मतदारांना करत आहेत.
विशेष करून, महिलावर्गात सखीताईंची चांगलीच भुरळ पडल्याचे दिसून येत असून, त्यांच्या प्रचारसभा व गावभेट दौर्यांना महिलांसह युवती मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.भूम-परांडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली असून, झालेली विकासकामे, व विकासाचा त्यांनी मांडलेला रोडमॅप ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आहे, त्यामुळेच जनमत त्यांच्या बाजूने निर्माण झालेले आहे. प्रा. डॉ. सावंत यांनी गावभेट दौरे, सभा, घोंगडी बैठका यातून जनतेशी संपर्क साधून आपली भूमिका समजावून सांगण्यात यश मिळवलेले असतानाच, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत आणि कार्यसिद्धी प्रतिष्ठाणचे संस्थापक, युवा नेते गिरीराज सावंत यांनीदेखील प्रचाराची धुरा आपल्या खंद्यावर घेऊन प्रचारात आघाडी घेतली आहे.
जसजशी मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे, तसतसे मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. सगळीकडे प्रचाराचा धुराळा उडालेला असताना, प्रचारात प्रा. डॉ. सावंत यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या विरोधात तीन प्रमुख राजकीय पक्ष उभे ठाकले असतानाही झालेली विकासकामे, भविष्यातील विकासकामांचा मांडलेला रोडमॅप, आणि मतदारसंघाला पुन्हा मिळणारे मंत्रीपद या मुद्द्यांवर प्रा. डॉ. सावंत यांच्या बाजूने जनमत वळलेले दिसत आहे.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, युवा नेते गिरीराज सावंत यांच्या गावभेट दौरे, घोंगडी बैठकांना जोरदार प्रतिसाद लाभत असतानाच, आजोबाच्या प्रचारासाठी नात सखीताई सावंत यांनीदेखील प्रचारात उतरत आघाडी घेतली आहे. सखीताईंच्या गावागावांत सुरू असलेल्या जनसंवाद दौर्यादरम्यान महिलावर्ग, युवती या त्यांच्याभोवती गर्दी करत असून, त्यांची भूमिका समजून घेत आहेत. लाडक्या बहिणीसाठी महायुती सरकार देत असलेली आर्थिक मदत, मतदारसंघातील सुटलेला पाण्याचा प्रश्न, महिलांच्या डोक्यावरील हंडे उतरविण्यात आलेले यश, मतदारसंघाचा झालेला विकास, आणि पुढील काळात करायची विकासकामे याबाबत त्या मतदारांत जनजागृती करून, आजोबा तानाजीराव सावंत यांच्यासाठी मते मागत आहेत. त्यांच्या या जनसंपर्क दौरे व सभांना लाडक्या बहिणींसह भावांचादेखील उदंड प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे.
सखीताई सावंत यांनी दि. १२ रोजी भूम तालुक्यातील डोकेवाडी, लांजेश्वर, आंदरूड गावात जनसंवाद दौरा केला. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अर्चनाताई दराडे, सहीताई गणेश शेंडगे, प्रणिती दराडे व वेगवेगळ्या गावांतील महिला, लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. डोकेवाडी येथे ग्रामपंचायत सदस्य सुरेश खैरे, दादासाहेब जालन, प्रशांत रोटे, गोरख साळुंखे, संभाजी थोरात, सरपंच सुषमा थोरात, ग्रामपंचायत सदस्य अजित पवार, भाऊसाहेब खैरे, महाराज रघुनाथ आहेर, प्रसाद पवार, उद्धव डोके, विकास महाराज जालन, रोहिनी रोटे, सुनिता गोरख यांच्यासह महायुती व मित्र पक्षातील गाव व परिसरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक व लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करून उपस्थितांचे आभार सुभाष भोसले यांनी मानले.