Advertisement

बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याने मराठा समाज संतप्त

प्रजापत्र | Wednesday, 13/11/2024
बातमी शेअर करा

 छत्रपती संभाजीनगर-  परतूर विधानसभा मदारसंघातील महायुतीचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी प्रचारादरम्यान आष्टी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मराठा समाजाबद्दल केलेल्या विधानाने मराठा समाजात नाराजीचा सुरू कायम आहे. यांचा फटका विधानसभा निवडणुकीत बसणार असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडिया वर उमटत आहे. लोणीकरांनी केलेल्या खुलाशातून मराठा समाजाचे समाधान होत नसल्याचे सोशल मीडियातील प्रतिक्रियेतून दिसत आहे.

 

 

'मराठा समाजाची कांड्यावर मोजण्या इतकी मते आहेत' या लोणीकरांच्या विधानाने मतदार संघातील वातावरण तापले आहे. विशेषतः मराठा समाजातून लोणीकरांच्या या विधानाचा जोरदार निषेध केला जात आहे. दरम्यान वादग्रस्त विधानाची चित्रफीत व्हायरल झाल्यानंतर या बाबतचा खुलासा लोणीकरांनी चित्रफितीद्वारे केला आहे. आष्टीत मराठा समाजाची मते कमी असतील बोटावर मोजण्याइतकी निश्चितच नाहीत.

मराठ्यांच्या मतावर निवडून येणारे लोणीकर जर मराठा समाजाला कांड्यांवर मोजत असतील तर, मतदार संघातील इतर एखाद्या गावात काही इतर समाजाची मते कमी असतील तर लोणीकर त्यांना ही बोटावरच मोजणार आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे. मराठा समाजाला भाजपकडून ओबीसीमधून आरक्षणसाठी टाळले जात असल्याने भाजपला मराठा समजाबद्दल जो आकस तिरस्कार आहे.

 

 

विधान दुर्दैवी
मराठा समाजाविषयीच्या वक्तव्याने मराठा समाजा विषयी लोणीकरांच्या पोटातले ओठावर आले तर नाही ना असा सवाल उपस्थित केला आहे. लोणीकरांनी ते केलेले विधान दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया मराठा समाजातील जाणकार व्यक्तींकडून ऐकावयास मिळत आहेत.

Advertisement

Advertisement