Advertisement

 पुढच्या बारा दिवसात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार

प्रजापत्र | Wednesday, 13/11/2024
बातमी शेअर करा

भंडारा :  भाजप आता सत्तेत येत नाही. पुढच्या बारा दिवसात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आणि मुख्यमंत्र्याची चर्चा होणार असं त्यांना वाटतं असेल, याचा अर्थ बावनकुळे साहेबांनी हार मानलेली आहे. त्यांनी काय बोलालं यापेक्षा महाविकास आघाडीचे सर्व नेते आम्ही याबाबत निर्णय घेऊ. मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नसून कार्यकर्ता म्हणून मविआसाठी फिरत आहे. सर्व निर्णय शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी घेतील; असा टोला रोहित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला. 

 

 

भाजपचे (BJP) नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीमध्ये रोहित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह बारा- बारा नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे वक्तव्य केले होते. यावर बोलताना आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

 

 

महाविकास आघाडीच्या १८० जागा येतील
छगन भुजबळांची ती भूमिका असेल. शरद पवारांचीही भूमिका अशीच आहे; ज्यांचं कुणाचं काही चुकलं असेल, ज्या गोष्टीवर या राज्यावर अन्याय झाला असेल. त्यावर चर्चा व्हावी. जर कोणी नेते भाजपसोबत गेले त्यांची इच्छा असेल की चर्चा व्हावी, तर होऊन जाऊ देतं समोरासमोर चर्चा. कोण काय बोलतात बघू. कोण काय काय बोलतोय कुठे कुठे पाणी मुरलंय. हे त्या ठिकाणी चर्चा होईल. राज्यात महाविकास आघाडीच्या १६७ ते १८० जागा येतील; असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला . 

Advertisement

Advertisement