Advertisement

मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला

प्रजापत्र | Sunday, 10/11/2024
बातमी शेअर करा

जुन्नर- केंद्र शासनाने महाराष्ट्राला सातत्याने दुजाभावाची वागणुक दिली आहे. महाराष्ट्रातील उद्योग प्रकल्प गुजरातला नेले आहेत. भाजप व मित्रपक्षाने महागाई वाढवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला असल्याची टीका जयंत पाटील यांनी जुन्नर येथे केली. महविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. 

 

 

पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील प्रत्येक सर्वसामान्य घरात घरखर्च करण्याची समस्या भेडसावत आहे. देशात चुकीची राजनीती व आर्थिक नीती सुरू आहे.  .जीएसटी मुळे साध्या जीवनावश्यक गोष्टी देखील महागल्या आहेत. राज्य शासन केंद्र शासनाला जाब विचारू शकत नाही. महायुतीचे राजकारण केवळ लाडक्या खुर्चीसाठी चालले आहे. महाविकास आघाडीला सत्तेत येण्याचा पूर्णपणे आत्मविश्वास आहे. ५० टक्केपेक्षा जास्त आरक्षण देणे, जातनिहाय जनगणना करणे याचा महाविकास आघाडीच्या विकासाच्या पंचसुत्रीत समावेश असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

Advertisement

Advertisement