नांदेड : नांदेड उत्तरमध्ये गद्दाराला गाडून मशाल पेटवा; असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत. ज्यांनी ज्यांनी गदारी केली, ती गद्दारी राजकारणातून नष्ट करावी लागेल. असेही ठाकरे यांनी सांगितले आहे.
नांदेड (Nanded) उत्तरच्या विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून अब्दुल सत्तार तर ठाकरे गटाकडून संगीता पाटील डक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नांदेड उत्तरमधून काँग्रेसचे उमेदवार अब्दुल सत्तार हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे सांगितले. तर आज (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनी संगीता पाटील डक यांना निवडून आणण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले.
नांदेड उत्तरमध्ये गद्दाराला गाडून मशाल पेटवा; असे आदेश ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले. ज्यांनी ज्यांनी गदारी केली, ती गद्दारी राजकारणातून नष्ट करावी लागेल. उमेदवारी वरून अनेक जण नाराज झाले होते. पण व्यक्तीगत विरोध पाहता आपला भगवा झेंडा कसा विजयी झाला पाहिजे; याचा विचार करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले आहे. दरम्यान वंचितचे नेते डॉ. बिडी चव्हाण यांच्यासह अनेकांनी ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला आहे.