Advertisement

दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, काय चाललय?

प्रजापत्र | Saturday, 09/11/2024
बातमी शेअर करा

राज्याचे राजकारण इतके गलिच्छ पद्धतीने सुरु आहे की ७५ वर्षांत एवढे गोंधळाचे राजकारण पहायला मिळाले नाही. विकासावर बोलायचे बाजुलाच राहिले हे लोक हेव्या दाव्यांवर बोलायला लागले आहेत. इगतपुरीचेच उदाहरण बघा ना प्रस्थापित जो आमदार होता त्याने ह्या पक्षातून त्या पक्षात उडी मारली. आपापल्या खुर्च्या सांभाळण्यासाठी हे घाणेरडं राजकारण चालू आहे, असे संभाजी राजे छत्रपती म्हणाले.

 

 

स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजी राजे यांनी आज नाशिक जिल्ह्यामध्ये तिसऱ्या आघाडीच्या प्रचारात भाग घेतला. यावेळी त्यांनी महायुती आणि मविआमध्ये सुरु असलेल्या घाणेरड्या राजकारणाचा उल्लेख केला. काय चाललय हे सगळं ? दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी. हे सर्व पुसून काढण्यासाठी परिवर्तन महाशक्ती हाच पर्याय आहे, असे ते म्हणाले. 

सुसंस्कृत, सुशिक्षित अभ्यासू व्यक्तिमत्त्व आसलेल्या डॉ. शरद तळपाडे याना आम्ही उमेदवारी दिली आहे. आपल्या भागाचा विकास कसा करता येईल याबरोबर आपल्या मतदार संघातील प्रश्न ते विधानसभेत चांगल्या प्रकारे मांडू शकतील. इगतपुरीत प्राथमिक आरोग्य केंद्र चांगले नाहीत. इथे रोजगार व चांगल्या शिक्षण संस्था नाहीत. हा आदिवासी बहुल भाग आहे बहुजन समाजही आहे. त्यांचा फायदा घ्यायचा मोठ मोठ्या पुढाऱ्यांनी असे इथून पुढे चालणार नाही, असे संभाजी राजे म्हणाले. 

Advertisement

Advertisement