Advertisement

निवडणुकीत महाराष्ट्रात पैशांचा पडतोय पाऊस

प्रजापत्र | Friday, 08/11/2024
बातमी शेअर करा

नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रलोभनापासून रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईत आजपर्यंत तब्बल ४३८ कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यात एकट्या महाराष्ट्रातून २८० कोटींचा ऐवज जप्त झाला असून २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत या रकमेत तिप्पटीने वाढ झाली आहे. जप्त केलेल्या ऐवजमध्ये रोख रक्कम, मद्यसाठा, अमली पदार्थ तसेच मौल्यवान धातू व भेटवस्तूंचा समावेश आहे.

 

 

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि झारखंडसोबतच विविध राज्यांमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीतही मतदारांना प्रलोभनापासून रोखण्यासाठी तपास यंत्रणांमार्फत कारवाई केली जात आहे. याअंतर्गत महाराष्ट्रातून २८० कोटी रुपयांचा, झारखंडमधून १५८ कोटी रुपयांचा तर पोटनिवडणुका होत असलेल्या राज्यांमधून ११८ कोटी रुपयांचा असा एकूण ५५८ कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १०३ कोटी कोटीचा तर झारखंडमध्ये केवळ १८.७६ कोटी रुपयांचा ऐवज जप्त झाला होता याकडे निवडणूक आयोगाने लक्ष वेधले.

 

 

महाराष्ट्रातून जप्त झालेला ऐवज (कोटी रुपयांत)
रोख रक्कम - ७३.११

मद्यसाठा - ३७.९८

अमली पदार्थ- ३७.७६

दागदागिने - ९०.५३

भेटवस्तू - ४२.५५

एकूण – २८१.९३

Advertisement

Advertisement