शिर्डी : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. बंडखोरांच्या मनधरणीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न केले गेले. शिर्डी विधानसभा मतदारसंघात (Shirdi Assembly Constituency) भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा (Dr Rajendra Pipada) यांनी बंडखोरी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दोन दिवसापूर्वी पिपाडा यांना स्पेशल विमानाने बोलवून घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शिर्डी विधानसभा मतदारसंघात बंडखोरी कायम राहिली आहे. त्यामुळे आता मविआकडून प्रभावती घोगरे (Prabhavati Ghogare), महायुतीकडून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) तर अपक्ष राजेंद्र पिपाडा यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
बातमी शेअर करा