पुणे- आर. आर. पाटील यांच्याबद्दल अजित पवारांनी केलेल्या विधानाबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. अजित पवार आर.आर. पाटलांबद्दल असंवेदनशीलपणे बोलले, असे म्हणत इतकं गलिच्छ राजकारण आपण करायला नको, अशी शब्दात सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना सुनावले.
दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी आर.आर. पाटलांबद्दल जे वक्तव्य केलं, अर्थातच त्याचा सगळ्या महाराष्ट्राने निषेध केलेला आहे. आपल्याकडे मराठी आणि भारतीय संस्कृतीत एखादा माणूस जेव्हा जातो. तेव्हा त्याचबरोबरचं आपण सगळं सोडून देतो. आपली कटुता, कितीही वैरी असला तरी..., आर.आर. पाटलांबद्दल असंवेदनशीलपणे अजित पवार बोलले, याचं दुःख आयुष्यभर राहिल.", असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
"गेलेल्या माणसाबद्दल कधीच वाईट बोललं नाही पाहिजे. कैलासवासी मुंडे साहेब आज आपल्यात नाहीत. महाजन साहेब आपल्यात नाहीत. पण, कधीही त्यांच्या कुटुंबात, आम्ही अनेक वर्ष एकमेकांच्या विरोधात काम केलं. कधीही त्या कुटुंबाबद्दल एक शब्दही काढला नाही, काढणार नाही. इतकं गलिच्छ राजकारण आपण करायला नको", असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.