Advertisement

साहेब येतील डोळ्यात पाणी आणतील

प्रजापत्र | Tuesday, 29/10/2024
बातमी शेअर करा

पुणे : 'आई सांगतेय की, माझ्या दादाच्याविरोधात फॉर्म भरू नका", असं सांगतानाच अजित पवार भावूक झाले. त्यानंतर 'साहेबांनी तात्यासाहेबांचं घर फोडलं का?', असे अजित पवार म्हणाले. अजित पवारांनी केलेल्या या विधानाला उत्तर देत शरद पवारांनी त्यांची नक्कल करत खिल्ली उडवली. सहा महिन्यांपूर्वीची भाषणं आणि आताची भाषणं काय आहेत? असा सवाल शरद पवारांनी केला. 

ज्या कान्हेरीत अजित पवारांनी २८ ऑक्टोबर रोजी सभा घेतली. त्याच ठिकाणी आज (२९ ऑक्टोबर) युगेंद्र पवार यांच्या प्रचाराची सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवारांनी अजित पवारांकडून करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर दिले. तसेच सहा महिन्यांपूर्वीच्या भाषणांची आठवण अजित पवारांना करून दिली. शरद पवारांनी अजित पवारांची नक्कलही केली. 

 

अजित पवारांची नक्कल, शरद पवार काय म्हणाले?

युगेंद्र पवारांच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवार म्हणाले, "काल भाषणात सांगण्यात आलं की, घर फोडलं. घरं फोडण्याचं पाप माझ्या आईवडिलांनी, माझ्या भावांनी मला कधी शिकवलं नाही. माझे भाऊ सगळे, अनंतरावांसह माझ्यावर प्रचंड प्रेम करणारे होते. मी कधी घरचा संसार बघितला नाही. शेती बघितली नाही. सगळी यांनी बघितली. मी आपलं गावभर हिंडत बसलो. राजकारण करत बसलो. देशाच्या पातळीवर करत बसलो. का, या सगळ्या भावांचे आशीर्वाद आणि आधार मागे होता म्हणून मी हे करू शकलो", असे उत्तर शरद पवारांनी अजित पवारांना दिले. 

Advertisement

Advertisement