छत्रपती संभाजीनगर : मराठा समाज एकत्र झाल्याने सगळ्याच पक्ष्यातील येत आहेत. रात्री दोन वाजले की भाजपचे सुद्धा येऊ लागले आहेत. इतकेच नाही तर भाजपमधले तिकीट हुकलेले ते तर जॉईन झाले आहेत. आम्ही ताकतीने बलाढ्य होतो. मात्र आम्हाला गिणीत नव्हते. आता मात्र गोरगरीब मराठ्यांच्या चपलासकट पाया पडत आहेत. आज सगळे नेते मराठ्यांना विचारायला लागले ही चांगली गोष्ट असल्याचे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.
संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीच्या सरकारवर देखील निशाणा साधला आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर बोलताना जरांगे पाटील यांनी सांगितले कि, चंद्रकांत दादा यांचे काही चुकूले नाही. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली, शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला, शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावल्या, मराठ्यांना आत्महत्या कराराला लावल्या. धनगर समाजाला आरक्षण दिले. मराठ्यांना आरक्षण न देता ओबीसींना दिलं हे चांगलं काम केलं. मराठ्यांना SCBC आरक्षण देऊन EWS घातलं छान काम आहे. मराठ्याच्या पोरावर केस केल्या; असे म्हणत चंद्रकांत पाटील यांना टोला लगावत देवमाणूस आहे. दादा शेंदूर लावायला, पाहिजे कोणी फक्त दादाला शेंडी ठेवली पाहिजे उघडी; असेही ते म्हणाले.