Advertisement

 आदित्य ठाकरेंना वरळीत शिंदे गटाकडून तगडं आव्हान

प्रजापत्र | Friday, 25/10/2024
बातमी शेअर करा

 मुंबई- वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवेसना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. यावेळी त्यांना वरळी विधानसभेतून कडवे आव्हान मिळणार आहे. २०१९ साली त्यांनी जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढविली होती, तेव्हा मनसेने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांना शिवसेनेत घेण्यात आले होते. तसेच वरळीचे स्थानिक नेते शिंदे यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले होते. शिवसेना-भाजपाची युती असल्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी पहिली निवडणूक तुलनेने सोपी गेली होती. मात्र यावेळी मनसेकडून संदीप देशपांडे आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून मिलिंद देवरा यांचे तगडे आव्हान आदित्य ठाकरेंच्या विरोधात उभे राहिले आहेत .

Advertisement

Advertisement