Advertisement

राजकारणातील सर्व पुतण्यांचा डीएनए सारखाच

प्रजापत्र | Friday, 25/10/2024
बातमी शेअर करा

नाशिक : माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच येत्या 28 तारखेला ते नांदगाव विधानसभा मतदारसंघातून (Nandgaon Assembly Constituency) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यामुळे महायुतीत बंडखोरी होणार असल्याचे दिसून येत आहे. आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

 

छगन भुजबळ म्हणाले की, राजकारणात असलेल्या सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच आहे. शरद पवारांचा पुतण्या, गोपीनाथ मुंडेचा पुतण्या, बाळासाहेब ठाकरे यांचा पुतण्या, राजकारणातील सगळेच पुतणे यांचे डीएनए सारखाच आहे, असे त्यांनी म्हटले आहे. छगन भुजबळांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

Advertisement

Advertisement