Advertisement

दहावीच्या परिक्षेत मोठा बदल!

प्रजापत्र | Tuesday, 22/10/2024
बातमी शेअर करा

मुंबई - महाराष्ट्र बोर्डाने दहावीच्या परिक्षेत अत्यंत महत्वाचा बदल केला आहे. या बदलामुळे आता गणित आणि विज्ञान या विषयांची भीती वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये आता ३५ पेक्षा कमी आणि २० पेक्षा जास्त गुण मिळाले तरी विद्यार्थांना अकरावीच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नव्या अभ्यासक्रम आराखड्यात यासंबधी तरदूद करण्यात आली आहे.

 

शाळेत असताना अनेक विद्यार्थांना गणित आणि विज्ञान हे विषय कठीण जातातय. या विषयांमध्ये बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात ३५ गुण आवश्यक असतात. मात्र, यापुढे विद्यार्थ्याने गणित आणि विज्ञानात या दोन विषयात २० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले तर त्याला उत्तीर्ण केले जाईल. पण अशा परिस्थितीत संबंधित विद्यार्थ्याच्या निकालावर एक विशेष शेरा देण्यात येईल. यामुळे विद्यार्थ्यांसमोर प्रमाणपत्र घेऊन अकरावीत प्रवेश घेणे किंवा पुन्हा परीक्षा देणे, असे दोन पर्याय उपलब्ध असतील.

 

 

यामुळे ज्या विद्यार्थ्यांना गणीत किंवा विज्ञान अशा शाखांमध्ये करियर करायचे नाही अशा विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. असे विद्यार्थी या दोन विषयात कमी गुण मिळाल्याने त्याच इयत्तेत अडकून राहाणार नाहीत. दहावीत गणीत या विषयात कमी गुण मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणालाच ब्रेक लागतो. या बदलामुळे असे होणार नाही, विद्यार्थांना इतर क्षेत्रात आपले शिक्षण शुरू ठेवता येईल. दरम्यान शिक्षण आराखड्यातील या तरतुदींवर शिक्षणतज्ज्ञांकडून आक्षेप घेतला जात आहे. तसेच याचा विद्यार्थ्यांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Advertisement