चर्चेतले
बीड-राजेंद्र मस्के यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपाच्या नवीन जिल्हाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याच्या चर्चा सुरु झाल्या असताना सोशल मीडियावर सर्जेराव तांदळे यांचे नाव आघाडीवर येत आहे.निष्ठावंताला न्याय मिळालाच पाहिजे असा सूर तांदळे आणि मुंडे समर्थकांमधून जोर धरत आहे.सर्जेराव तांदळे भाजपमध्ये ३० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत.उपेक्षित कार्यकर्त्याला पदाच्या माध्यमातून न्याय मिळावा अशी मागणी जोर धरत आहे.
भाजपाचे बीड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी कालच पदाचा राजीनामा दिला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्याने विधानसभा निवडणुक कॅप्टन विना कशी लढविणार यामुळे नवीन जिल्हाध्यक्ष निवडण्याच्या हलचाली पक्ष पातळीवर सुरू झाली आहे. नवीन जिल्हाध्यक्ष निवडीसाठी अनेकांची नावे चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु या सर्वांमध्ये सर्जेराव तांदळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते, सर्जेराव तांदळे हे राष्ट्रीय सचिव तथा आमदार पंकजा मुंडे यांचे विश्वासू म्हणून ओळख आहे. तसेच ते मागील तीस वर्षांपासून भाजपामध्ये एकनिष्ठ राहिले आहेत. तसेच त्यांचे जिल्ह्यातील संघटनही चांगले आहे. मुंडे साहेबांपासून ते आमदार पंकजा मुंडे यांच्यापर्यंत निष्ठेने काम करत आहेत. या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. यापूर्वीही त्यांचे नाव जिल्हाध्यक्ष पदासाठी चर्चेत होते परंतु त्यावेळी त्यांना थांबण्याचे सांगितले गेले होते. त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार माघार घेतली होती. परंतु यावेळी त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यांचे नाव आघाडीवर असल्याने त्यांना निष्ठेचे फळ मिळणार अशी चर्चा सुरू आहे.
बातमी शेअर करा