आरसा विधानसभेचा/ बीड- आष्टी
अंगद पानसंबळ
शिरुरकासार दि. २१: शिरूर कासार तालुका हा विधानसभेसाठी कोणालाच सलग गुलाल लागू देत नाही .
इथून मागचे निकाल जर पाहिले तर 2004 साली शिवसेनेचे उमेदवार सुनील धांडे हे निवडून गेले यानंतर बीड मतदार संघाचे विभाजन होऊन आष्टी पाटोदा या मतदार संघाला शिरूर चा चार जिल्हा परिषद गटांपैकी अडीच जिल्हा परिषद गट जोडल्या गेला. आष्टी विधानसभा मतदार संघ एकूण मतदार 383030 पुरुष मतदान 203838 तर महिला मतदार 179191 असून नवीन मतदान6700 इतके आहे यापैकी आष्टी तालुका सर्वाधिक210499 व पाटोदा तालुका 104852 असून शिरूर तालुका 67679 इतके मतदार आहेत.
2009 साली राष्ट्रवादीचे सुरेश धस हे निवडून गेले.2014 ला सुरेश धस हे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवल्यानंतर मुंडे यांचे अपघाती निधन झाले आणि लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्यात आल्या. यामुळे 2014 निवडणुकीत सुरेश धस यांचा निसटता पराभव झाला. दोनच वर्षानंतर माजी मंत्री सुरेश धस यांना बीड धाराशिव लातूर या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी देऊन विधान परिषदेवर आमदार करण्यात आले. यामुळे 2019 ची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीतर्फे भीमराव धोंडे यांनी लढवली आणि त्यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब आजबे यांनी केला.
आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सध्याचे वातावरण हे मराठा विरुद्ध ओबीसी असे असून प्रचंड धाकधूक उमेदवार आणि मतदारांमध्ये पहावयास मिळते. शिरूर तालुक्याने आमदारांना सलग गुलाल लागू न देण्याच्या प्रथेला खंड पडतो का हे पाहणे उत्सुक्याचे असेल.
बातमी शेअर करा