बीड-शहरातील एमआयडीसी भागातील म्हाडा कॉलनीत एका परप्रांतीय इसमाचा चाकू भोकसून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मध्यरात्री समोर आला आहे. ग्रामीण पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी दिली. दारूच्या नशेत असताना ही घटना घडली असल्याचे कळते.
ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एमआयडीसी भागातील म्हाडा कॉलनीत मध्यरात्री समीरभाई भारुत (वय-५० रा. गांधीनगर गुजरात) व चंदनकुमार राऊत (वय-२५ रा. बिहार) यांच्यात दारू पिऊन वाद झाले. या वादाचे रूपांतर थेट खुनापर्यंत गेले. चंदनकुमारने राग न सहन झाल्यामुळे चाकू भोकसून समीरभाई भारुतचा जागीच खून केला. ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेतली असता आरोपीला त्याच ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले.सध्या या खुनाचा तपास सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी दिली.

बातमी शेअर करा