Advertisement

बालकल्याण समितीतील सदस्याला लाच घेताना पकडले

प्रजापत्र | Monday, 21/10/2024
बातमी शेअर करा

बीड दि.२१ (प्रतिनिधी)-लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Beed) सोमवारी (दि.२१) शहरातील बालकल्याण समितीतील सदस्याला (Child Welfare Committee Member) सापळा रचून १२ हजारांची लाच घेताना (Taking a bribe of 12 Thousand) रंगेहात पकडले आहे.जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau Beed) कारवाया सातत्याने सुरु असतानाच आता आणखी एकावर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station Beed) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
       बीड जिल्ह्यात शंकर शिंदे (Shankar Shinde) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सूत्रे हाती घेतल्यापासून लाचखोरांवर मोठ्या प्रमाणावर कारवाया झाल्या आहेत.महसूल,पोलीस प्रशासन,एसटी महामंडळ,महावितरण,बांधकाम विभाग आणि आता बालकल्याण समितीतील सदस्य असलेल्या सुरेश प्रभाकर राजहंस (वय-४०) यास लाच घेताना रंगेहात पकडले.तक्रारदार यांची मैत्रीण महिला बाल स्वाधार गृहात दाखल असून तिला तक्रारदार यांनी सोडवण्या करिता दि.१० ऑक्टोबर रोजी अर्ज केला होता.त्यावरून सदरील मुलीला तक्रारदार यांचे ताब्यात देण्यासाठी बालकल्याण समितीचे सदस्य श्री सुरेश राजहंस यांनी स्वतः करिता व समितीतील इतर सदस्य करिता ५० हजारांच्या लाच मागणी करून तडजोडांती १२ हजार रुपये घेण्याचे पंचा समक्ष मान्य करून सापळा कारवाई दरम्यान १२ हजार रुपये लाच रक्कम स्वतःघेताना श्री सुरेश राजहंस यांना बाल कल्याण समितीचे कार्यालयात लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले.सध्या शिवाजी नगर ,बीड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे,अप्पर पोलीस अधिक्षक मुकुंद आघाव,पोलीस उप अधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनूस शेख, पोलीस अंमलदार, भरत गारदे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे यांनी केली. 

Advertisement

Advertisement