मुंबई- काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्यावरुन महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते एकमेकांना आव्हान देत आहेत. मविआ आणि महायुती मुख्यमंत्रीपदाचे नावे जाहीर करण्यास टाळाटाळ करत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानांमुळे मविआच्या नेत्यांमध्ये खदखद सुरु असल्याचे पाहायला मिळाले. मात्र उद्धव ठाकरेंनीही मविआने जाहीर केलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याला माझा पाठिंबा असेल असं म्हणत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी मोठं विधान केलं आहे. उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
बातमी शेअर करा