दिल्ली- राष्ट्रीय महिला आयोगाच्या (National Commission for Women) अध्यक्षपदी विजया किशोर रहाटकर (Vijaya Kishore Rahatkar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर डॉ. अर्चना मजुमदार यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन सदस्या म्हणून निवड केली आहे. याबाबतची अधिसूचना महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने जारी केली आहे.
राष्ट्रीय महिला आयोग कायदा, १९९० च्या कलम ३ अंतर्गत करण्यात आलेली ही नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी अथवा त्यांच्या वयाच्या ६५ वयापर्यंत असेल, असे शनिवारी जारी करण्यात आलेल्या सरकारी अधिसूचनेत म्हटले आहे.
बातमी शेअर करा