दिल्ली- केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी चांगली बातमी मिळाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने डीए वाढवण्याबाबत निर्णय घेतला असून महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्यात येणार आहे. ही डीए वाढ ७ व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत असेल. यामुळे कर्मचाऱ्यांना डीए मूळ वेतनाच्या ५३ टक्के मिळेल.
किती कर्मचाऱ्यांना फायदा होईल?
केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा फायदा 68 लाखांहून अधिक कर्मचारी आणि सुमारे 42 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. वाढीव पगार, पेन्शनसोबतच कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 3 महिन्यांची थकबाकीही मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड होणार आहे.
कर्मचाऱ्यांसोबतच निवृत्तीवेतनधारकांनाही सरकारने महागाई भत्त्यात केलेल्या वाढीचा फायदा होणार आहे. वास्तविक, पेन्शनधारकांना सरकारकडून महागाई सवलत देण्यात येते.