जालना- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. तात्काळ आचारसंहिता देखील लागू झाली आहे. पण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळं मराठा आरक्षणाचे आंदोलक जरांगे यांनी उपमुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिलं आहे. आता तुमचा सुफडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
निवडणूक जाहीर होताच जरांगेंनी माध्यमांशी बोलताना मराठा समाजाला आवाहन केलं की, मराठ्यांनी १०० टक्के मतदान करावं, एकही मतदान वाया जाता कमा नये. कारण आता अशी वेळच आली आहे. त्यांना (भाजप) आपल्याला संपवायचं आहे. विधासभेसाठी आता वेगानं आपल्याला ताकद दाखवायची आहे.
बातमी शेअर करा