मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार राज्य विधानसभेसाठी नोव्हेंबर महिन्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील निवडणूक एकाच टप्प्यात घेण्याचा निर्णय जाहीर केला असून त्यानुसार २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी २३ तारखेला होणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया मात्र दिवाळीच्या अगोदरच पूर्ण होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आता खालील कार्यक्रमाप्रमाणे महाराष्ट्रात निवडणूक होतील
अधिसूचना : २२ ऑक्टोबर
अर्जाचा शेवटचा दिवस : २९ ऑक्टोबर
छाननी : ३० ऑक्टोबर
माघार : ४ नोव्हेंबर
मतदान : २० नोव्हेंबर
मतमोजणी : २३ नोव्हेंबर