मुंबई-शेवटच्या घटका मोजत असलेल्या घटनाबाह्य सरकारने शेवटच्या दिवशी सुद्धा घटनेला तडे देण्याचे प्रयत्न सोडलेले नाही. राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय न्यायप्रविष्ट असताना देखील शेवटच्या दिवशी आमदार बनवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. केएफसीच्या गरुडा- अधिराप्रमाणे सर्व नियम कायदे बाजूला सारून ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने वागणाऱ्या या संविधनविरोधी सरकारचा अंत केल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही. असो सरकारला सत्तेतून महाराष्ट्र हद्दपार करेल याची शाश्वती आली असावी आणि या भीतीतूनच आमदार नियुक्तीचा निर्णय घेतला असेल, अशी टीका रोहित पवार यांनी केली.
बातमी शेअर करा