मुंबई : राज्यात विधानसभेची निवडणूक जवळ आली असून पुढील काही दिवसांत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या राज्यातील सर्वच पक्षांचे नेते जोरदार कामाला लागले आहेत. अनेक नेत्यांकडून मतदारसंघात मोर्चेबांधणी देखील सुरु आहे. तसेच विविध ठिकाणी सभा आणि मेळावे घेतले जात आहेत. यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचंही पाहायला मिळत आहे.
यातच काँग्रेसच्या अमरावती विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार सुलभा खोडके या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या चर्चांनंतर काँग्रेसने आमदार सुलभा खोडके यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. आमदार सुलभा खोडके यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे