नाशिक : नाशिकमध्ये आर्टिलरी सेंटरमध्ये देवळाली कॅम्प येथे प्रशिक्षणादरम्यान दोन अग्निविरांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. देवळाली कॅम्प येथील आर्टिलरी फायरिंग रेंजमध्ये 'आयएफजी इंडियन फिल्ड गन'ने फायरिंग सुरु होती. त्यावेळी 'शेल'चा ब्लास्ट झाल्याने त्याचा तुकडा अग्निवीर जवानांच्या शरीरात घुसला. दोघेही गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. गोहिल विश्वराज सिंग (वय २०) आणि सैफत शित (वय २१) अशी शहीद झालेल्या दोघांची नावे आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दरवर्षी स्वातंत्र्यदिनाला लाल किल्ल्यावर २१ तोफांची सलामी दिली जाते. आता भारतीय बनावटीच्या 'इंडियन फील्ड गन'चा वापर करण्यात येतो. इंडियन फील्ड गनचे तीन प्रकारचे मॉडेल आहेत, यामध्ये MK-1, MK-2 आणि ट्रक माउंटेड असे आहेत. वजनाने हलकी असलेली तोफ तीन तुकड्यांमध्ये कुठेही नेणे शक्य होते.