मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पत्रकारांसाठी आणि वृतपत्र विक्रेते यांच्यासाठी दोन स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे.
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या कॅबिनेट बैठकीत जवळपास ८० निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती दिली. महामंडळ, शिक्षक याबाबत निर्णय घेतले, यामध्ये संत गोरोबा कुंभार, कोळी समाज महामंडळ प्रस्ताव मागवला आहे असेही पाटील यांनी सांगितले. तसेच या बैठकीत नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट उत्पादनाची मर्यादा आठ लाखांवरून आता पंधरा लाखांची करण्यात यावी असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे.
बातमी शेअर करा