Advertisement

 जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला दणका

प्रजापत्र | Tuesday, 08/10/2024
बातमी शेअर करा

 जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला मोठा दणका बसला आहे. तर काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडीला मोठला मोठं यश प्राप्त झालं आहे. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बडगाम विधानसभा मतदारसंघातून विजय संपादन केला आहे. याचदरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे वरिष्ठ नेते फारुक अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्र्यांबाबत मोठी घोषणा केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आघाडीला यश मिळताच त्यांनी मुख्यमंत्र्यांचही नाव देखील जाहीर केलं आहे.

 

 

ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा फारुक अब्दुल्ला यांनी केली आहे. तर केंद्रातील भाजप सरकारने ५ ऑगस्टला घेतलेला निर्णय जनतेला मान्य नाही हे निकालातून दिसलं आहे, असं फारुक अब्दुल्ला म्हणाले. लोकांनी आपला जनादेश स्पष्ट दिला आहे, असेही फारुक यांनी सांगितलं.

'लोक कलम ३७० हटवण्याच्या विरोधात होते. या निवडणुकीत सहभागी होणाऱ्या लोकांचे आभार. त्यांना स्वतंत्र्यरित्या मतदान केलं. त्यांनी निवडलेलं सरकार लोकांच्या समस्या दूर करेल. आता बेरोजगारी कमी करायची आहे. तसेच महागाई देखील कमी करण्याचा प्रयत्न राहील. आता ९० विधानसभा मतदारसंघातक आमदार लोकांसाठी काम करतील, असे त्यांनी जाहीर केले.

Advertisement

Advertisement