पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मोदी यांनी आज वाशिममधील पोहरादेवीचे दर्शन घेतले. यावेळी बंजारा समाजाला संबोधित केले. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी पीएम शेतकरी योजनेचा १८ वा हप्ताचा मिळण्याचा मार्ग मोकळा केला. त्यांच्या हस्ते हप्त्याच्या वितरणास प्रांरभ करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पीएम शेतकरी सन्मान योजनेच्या पैशाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पीएम शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तीन हप्त्यामध्ये हे पैसे दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांना आतापर्यंत १७ हप्ते मिळाले आहेत. यासाठी सरकारने आतापर्यंत ३४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. माहितीनुसार, देशातील तब्बल ९.८ कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अठराव्या हप्त्यासाठी केंद्र सरकारने २० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाशिममधील पोहरादेवीच्या दर्शनासाठी आले आहेत. असे करणारे ते पहिली पंतप्रधान ठरले आहेत.
एकूण चार हजार मिळणार
विशेष म्हणजे राज्य सरकारने केंद्र सरकारच्या योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेनुसार देखील शेतकऱ्यांना वर्षाला तीन टप्प्यात सहा हजार रुपये मिळणार आहेत. याचा अर्थ शेतकऱ्यांना वर्षाला एकूण १२ हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील ९१.५३ लाख शेतकऱ्यांना होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकूण ४ हजार रुपये मिळणार आहेत.